🌟भारत मजबूत,एकसंघ आहे तो फक्त संविधानामुळे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरकार इंगोले


🌟प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟 

✍🏻फुलचंद भगत

वाशीम :- डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संस्था प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर दिल्ली तालुका जिल्हा वाशीम,द्वारा संचालित प्रसंग करिअर अकॅडमी वाशीम येथे भारताचा 75 प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

                 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.गजपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प अधिकारी सतीश इंगोले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीम जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मां.सरकार इंगोले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,प्रशिक्षण संस्थेतील सर्व प्रशिक्षक,प्रशिक्षणार्थी यांनी प्रथम राष्ट्रगीत घेऊन सर्वांनी भारतीय संविधान मधील सरनामा अर्थात संविधानाची प्रास्ताविक याचे वाचन केले, प्रा.अमोल बोरकर सर यांनी प्रास्ताविक केले ,प्रशिक्षणार्थी 

खाडे यांनी संविधान कसे तयार झाले ,त्यातील परिशिस्ती याची माहिती दिली ,प्रमुख पाहुणे सरकार इंगोले यांनी भारतीय संविधान हे लवचिक असून ,त्या मध्ये मूळ मसुद्याला हात न लावता सुधारणा करता येतात ,तसेच भरता बरोबर स्वतंत्र झालेले देश रसातळाला गेले परंतु विविध भाषा,धर्म,जाती असून भारत एकसंघ आहे तो केवळ आपल्या संविधनामुळे असे प्रतिपादन केले महणून आज त्या संविधान कर्त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही असे उदगार काढले ,अल्पोफर देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या