🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा...!


🌟याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

पूर्णा (दि.२७ जानेवारी) प्रतिनिधी - पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच त्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयात सामुदायिक राष्ट्रगीताने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांनी महाराष्ट्र गीत गायले. प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देतांना संचलन क्रीडा संचालक डॉ भारत चापके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले. 

याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या