🌟परभणीत 'मेरा भारत विकसित भारत' जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा संपन्न.....!


🌟राज्य पातळीवर पुरस्कारचे स्वरुप प्रथम विजेता एक लाख,द्वितीय विजेता 50 हजार,तृतीय विजेता 25 हजार रुपये असे स्वरुप🌟

परभणी (दि.15 जानेवारी) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरु युवा केंद्र परभणी यांच्या वतीने 10 जानेवारी  रोजी शारदा महाविद्यालय परभणी येथे मेरा भारत विकसित भारत @2047 या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेते अभिनव अनंत खुळे, द्वितीय विजेते गोविंद तुकाराम भांड, तृतीय विजेते अनुराग मोहन रास्कटला यांची निवड झाली असुन पुढील राज्य स्तरीय सपर्धे मध्ये प्रथम विजेता अभिनव अनंत खुळे यांची निवड केली आहे. राज्य पातळीवर पुरस्कारचे स्वरुप प्रथम विजेता एक लाख, द्वितीय विजेता 50 हजार, तृतीय विजेता 25 हजार रुपये असे स्वरुप आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. श्यामसुंदर वाघमारे, प्रा.डॉ. हनुमंत शेवाळे, डॉ. दत्ता शिंदे, ज्ञानोबा मुंढे आणि जिल्हा युवा अधिकारी शशांक रावुला या सर्वांनी प्रथम प्रतिमा पुजन केले. या स्पर्धेस परीक्षक म्हणून प्रा. डॉ. हनुमंत शेवाळे, डॉ. दत्ता शिंदे, डॉ. ज्ञानोबा मुंढे हे लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा सेना आणि शारदा महाविद्यालयातील  कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या