🌟पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचे वकृत्व स्पर्धेत घवघवीत यश....!


🌟परभणीत आयोजित जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कु.सिद्धी गोपीनाथ बुचाले हिने पटकावला द्वितीय क्रमांक🌟

पुर्णा : पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थिनी कु.सिद्धी गोपीनाथ बुचाले हिने वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ अंतर्गत भारतीय बाल विद्या मंदिर परभणी येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्राथमिक गटातून छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन ची विद्यार्थिनी कु. सिद्धी गोपीनाथ बुचाले हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून तिचा व तिचे मार्गदर्शक शिक्षक शिवाजी सारंग यांचे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले उपाध्यक्ष बळीरामजी भोसले मुख्याध्यापक एम जी कल्याणकर तसेच शिक्षक  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या