🌟पुर्णा रेल्वे स्थानकावर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.संजय बनसोडे यांचं भव्य स्वागत....!


🌟अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले स्वागत🌟 

परभणी/पुर्णा : महाराष्ट्राचे क्रीडा,युवक कल्याण मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजयजी बनसोडे नांदेडहून राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईला जात असताना दि.१५ ला रात्री १०:३० वाजता,पूर्णा रेल्वेस्टेशनवर अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो,पूज्य.भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्यांचा पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी माजी आरोग्य सभापती नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड,नगरसेवक मधुकर गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे,गौतम वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड,पी.जी.रणवीर,महानंद गायकवाड,सिद्धार्थ भालेराव उद्योजक गौतम भोळे,किशोर ढाकरगे,अतुल गवळी,राहुल धबाले, धम्मा खंदारे,राम भालेराव,राहुल दवणे,विशाल कांबळे,विजय खंडागळे,सुबोध सोनकांबळे,रवी गायकवाड,विकास घाते आदीसह अनेकाची उपस्थिती होती.दि.३१ जानेवारीला पूर्णा येथील बौद्ध परिषदेस येत असल्याचे त्यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या