🌟परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा.....!


🌟प्रत्येक तालुक्यातील एका आदर्श शाळेचा होणार सन्मान असे शिक्षणाधिकारी (प्रा) गणेश शिंदे यांनी कळविले 🌟

परभणी (दि.०२ जानेवारी) : परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आदर्श शाळा पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे दिनांक ०३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता भाग्यलक्ष्मी लॉन्स, बेलेश्वर मंदिराजवळ,नांदखेडा रोड,परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या, एक एसएससी परीक्षा, एनएमएमएक परीक्षा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अंतरिक्ष सहलीसाठी गेलेले विद्यार्थी यांचा व प्रत्येक तालुक्यातील एका आदर्श शाळेचा सन्मान करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा) गणेश शिंदे यांनी कळविले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या