🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे लाळ्या,खुरकुत लसीकरण शिबिर संपन्न....!


🌟यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माणिक आप्पा घुंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी/पाथरी (दि.२० जानेवारी) :- परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील वाघाळे येथे शनिवार २० जानेवारी रोजी पशुवैद्यकीय केंद्रात लाळ, खुरकूत व पी.पी.आर लसीकरण शिबिराचे उदघाटन गाव चे सरपंच बंटी पाटील घुंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माणिक आप्पा घुंबरे व पशुवैदकीय केंद्राचे प्रमुख डॉ.के.एन.जाधव,कल्याण काका घुंबरे ,रघुनाथ अंभुरे, कैलासराव सोळंके,बबनराव पाथरकर, शेख नायब इत्यादी पशुपालक गावकरी उपस्थित होते. या शिबिरा मध्ये गायी वर्ग ३१७ म्हैस वर्ग ७६ आणि शेळ्या मेंढ्या २८८ यांना लसीकरण करण्यात आले. शिबीर यशस्वीेसाठी डॉ. महेश घुंबरे, महेश कौसडिकर, भागवत मुंढे, कल्याण घोडके, ओम महत्मे, माऊली सूरवसे , संदीप लांडगे, भागवत एस.जी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या