🌟सर्वसामान्य माणसाचे समाधान हा खासदार साहेबांचा प्राधान्यक्रम🌟
नांदेड जिल्ह्यातील व मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवितांना प्रशासनावर उत्तम पकड असणे आवश्यक असते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल आदरयुक्त भीती असणे ही आवश्यक असते. जनतेचे प्रश्न सोडवताना कधीकधी कठोर भूमिकाही घ्यावी लागते. अशावेळी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत योग्य सुसंवाद होणे आवश्यक असते, या कामात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा हातखंडा आहे.
सर्वसामान्य माणसाचे समाधान हा खासदार साहेबांचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी तर साहेब नेहमीच राहतात. लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता अधिकारी व कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची दोन चाके आहेत. हे दोन्ही समान वेगाने व समान पद्धतीने एकत्रित चालल्यास लोककल्याण व्हायला वेळ लागणार नाही याची जाण खासदार साहेबांना आहे.
आपल्या भागाचा विकास होण्यासाठी केंद्र शासन अनेकविध लोकहिताचे निर्णय घेत आहे. हे निर्णय, ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामामुळे समाजात त्यांची स्वच्छ प्रतिमा निर्माण होते, ही भावना निर्माण करण्यासाठी जलद व पारदर्शी पद्धतीने काम करावे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक घटकाला सहज व सुलभ सेवा द्याव्यात. तसेच आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत असतांना नवनवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना राबवून अधिक संवेदनशीलपणे काम करावे, याबाबत खासदार साहेब नेहमीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देत असतात.
आपत्ती आणि संकट काळात शासन आणि प्रशासन अतिशय तत्परतेने आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडत असतात. घटनास्थळी अधिकारी उपस्थित आहेत, ही बाब जनतेला आश्वस्त करते समाधान आणि सुरक्षेची हमी देते. अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची याबाबत भूमिका अतिशय महत्त्वाची असते काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चुका होतात. त्याचा विचार करून मागे न राहता अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य बजावा, अशी भूमिका खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांची आहे.
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441
0 टिप्पण्या