🌟अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन....!


🌟अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या वतीने १० हजार प्रतीचे वितरण🌟

परभणी (दि.०३ जानेवारी) : दिल्ली येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा पक्षाचे ज्येष्ठ  नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते आज बुधवार दि.०३ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यावतीने प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी काढण्यात आलेल्या कालनिर्णय दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

   सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिली येथे भेट घेतली व नवीन वर्षाचे २०२४ चे  काढण्यात आलेले कालनिर्णय दिनदर्शिका भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हत्तीअंबीरे यांच्यावतीने दिनदर्शिकेच्या १० हजार प्रतीचे वितरण करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या