🌟पुर्णा तालुक्यातील फुलकळस शेत शिवारात रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त....!


🌟वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे🌟


पुर्णा (दि.०३ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील फुलकळस  शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे. परंतु उभ्या पिकांमध्ये रानडुकरे हैदोस घालत मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करत असुन रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

फुलकळस व परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बैल यांना खाण्यासाठी कडबा  उपलब्ध होईल या आशेने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी केली जाते. कापूस, ऊस,  आदी पिकांच्या तुलनेत ज्वारीची पेरणी अधिक आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर लपण असल्यामुळे डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ही रानडुकरे ज्वारीच्या शेतीमध्ये शिरून ज्वारी पिकाचे  नुकसान करीत आहेत. ज्वारी खाण्याबरोबरच ज्वारीत दडून बसलेली रानडुकरे खत, पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावरही हल्ला करु शकतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फुलकळस शिवारातील ज्वारी पिकाचे डुकरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या बाबीची स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दखल घेऊन बंदोबस्त करावा.

( ज्वारी उत्पादक शेतकरी माणिक गणपतराव नावकिकर  फुलकळस )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या