🌟पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांची अवघ्या सहा महिन्यात बदली ?


🌟पुर्णा पोलिस स्थानकाचा कायापालट करीत अल्पशा कालावधीतच करुन दिली जनसामान्यांना आपल्या शिस्तबद्ध कारभाराची ओळख🌟 

✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजित)

पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्याची शासन दरबारी अतिसंवेदनशील तालुका म्हणून नोंद असली तरी देखील या शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्वधर्मीय सर्व समाजातील सर्वसामान्य जनता मात्र अत्यंत हळव्या मनाची असल्यामुळे या जनसामान्यांच्या भावनांचा आदर करुन त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून सुरक्षा व्यवस्था प्रदान करीत पोलीस प्रशासनाप्रती विश्वास व आदराची भावना निर्माण करणारा तर गुन्हेंगारी प्रवृत्तीमध्ये कायदाची वचक निर्माण करणारा कर्त‌व्यदक्ष/कर्तव्यतत्पर लोकहितवादी अधिकारी मागील जुन २०२३ पर्यंत लाभला नव्हता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही परंतु जुलै २०२३ या महिन्यात पुर्णा पोलीस स्थानकाचा पदभार पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी स्विकारल्यानंतर मात्र शहरासह तालुक्यातील जनसामान्यांच्या मनात त्यांनी अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षिततेसह पोलीस प्रशासनाप्रती विश्वासासह आदराची भावना निर्माण तर केलीच याशिवाय पोलीस स्थानकाच्या इमारतीसह परिसराची सुधारणा तसेच कर्मचारी वर्गाला शिस्त लावून प्रशासकीय कारभारात देखील महत्वपूर्ण सुधारणा करीत आपल्या शिस्तबद्ध कारभाराची खरी ओळख जनसामान्यांना करुन देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.


पुर्णा पोलीस स्थानकात जनसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असतांना देखील पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी आपल्या शिस्तबद्ध कारभाराच्या बळावर मागील इतिहास पाहता शहरात जनसामान्य जनता व्यापारी वर्गाला वेठीस धरत दंगलसदृश परिस्थिती निर्माण होण्याची एकही घटना घडू दिली नाही हे विशेष मागील वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये शहरातील आनंद नगर परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या सशस्त्र हाणामारीची घटना देखील पोलिस निरीक्षक काकडे यांनी अत्यंत चोखपणे हाताळत घटनेतील आरोपींना जेरबंद करण्याचे कामतर केलेच याशिवाय या घटनेचे पडसाद शहरात कुठेही उमटू दिले नाही त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली यानंतर दिलं.०८ डिसेंबर २०२३ रोजी शहरातील गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालय परिसरात दुपारच्या सुमारास सशस्त्र हल्लेखोरांनी आकाश उर्फ लल्ला कदम या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेत देखील पोलिस निरीक्षक काकडे यांनी अत्यंत महत्वपूर्ण भुमिका पार पाडीत या घटनेचे शहरासह तालुक्यात कुठेही यत्किंचितही पडसाद उमटू न देता योग्य तपास करीत या घटनेतील जवळपास सात आरोपी जेरबंद करण्यात महत्वपूर्ण जवाबदारी पार पाडली होती.

पुर्णा पोलीस स्थानकात कोणताही पोलीस अधिकारी कार्यरत झाला तरी त्या अधिकाऱ्याला अश्या घटनांना सामोरे जावे लागणारच परंतु घडलेल्या घटनेचा अगदी सखोल अभ्यास करून त्या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची आणि घटनेचे तीव्र पडसाद कुठेही उमटू न देण्याची चाणाक्ष बुध्दीमत्ता पोलीस निरीक्षक काकडे यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांमध्ये देखील राहिल याची शाश्वती मात्र देता येणार नाही प्रशासनाने अश्या कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर अधिकाऱ्याला पुर्णेसारख्या अतिसंदनशील तालुक्यात जास्तीत जास्त कर्तव्य बजावण्याची संधी न देता अवघ्या सहा महिन्यांच्या आत लातूर येथे बदलीवर पाठवणे ही बाब जनसामान्यांच्या मनाला वेदना देणारीच म्हणावी लागेल त्यांची कर्तव्यदक्षता कर्तव्यतत्परता तसेच कर्तृत्वक्षमता निश्चितच कौतुकास्पद असल्यामुळे नुकतेच दि.०६ जानेवारी २०२४ रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांना प्रशासकीय क्षेत्रातला 'समाज भुषण' हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजाला देखील भुषणावह वाटावे असे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे बदलीनंतर देखील तमाम पुर्णेकरांना भविष्यात सदैव निश्चितच आठवणीत राहतील त्यांच्या कर्तृत्वाला तमाम पुर्णेकरांसह शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र व जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स परिवाराच्या वतीने शतशः सलाम.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या