🌟मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडेंची निवड....!


🌟परळीतील औद्योगिक वसाहत सांस्कृतिक सभागृहात 11 फेब्रुवारी रोजी 6 वे विभागीय शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या 6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  कै. रामभाऊ (आण्णा) खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

      परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी साप्ताहिक शिक्षण मार्ग आयोजित मराठवाडा विभागीय पातळीवरील शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.यापूर्वी पाच शिक्षक साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक तथा बीड जिल्हा शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष ए.तु. कराड आहेत. तर स्वागत अध्यक्ष पदाची धुरा प्रदीप खाडे हे सांभाळणार आहेत ते  कै. रामभाऊ आण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत. बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रदीप खाडे यांचे मोठे योगदान आहे.

   परळी येथील औद्योगिक वसाहत सांस्कृतिक सभागृहात 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार आहे.या एकदिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन कथाकथन परिसंवाद आणि कवी संमेलन तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या