🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन....!


🌟सरपंच सौ.रुक्मिणीबाई बोकारे यांनी गावातील वाचकांसाठी विविध वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यावेळी सुरू केला🌟

पुर्णा (दि.२६ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव येथे आज शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


या शुभ मुहूर्तावर ग्रामपंचायत कान्हेगावचे सरपंच सौ.रुक्मिणीबाई प्रकाशराव बोकारे यांनी गावातील वाचकांसाठी विविध नामांकित वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत कान्हेगाव येथे वाचकांसाठी विविध वर्तमानपत्रे दररोज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याप्रसंगी सरपंचांनी मनोगत व्यक्त करतांना गावातील वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास वाचन प्रेमींसाठी येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सांगितले. या उपक्रमाचे उद्घाटन कान्हेगावचे सरपंच, गावातील पदाधिकारी, पत्रकारबंधू, शिक्षकवृंद व सन्माननीय ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव येथील ध्वजारोहण कान्हेगाव येथील भूमिपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान श्री.गोपाळराव भगवानराव बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेमध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परिसर स्वच्छता उपक्रम, लेझीम, वक्तृत्वस्पर्धा, गायन अशा विविध स्पर्धा राबवून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसंगी गावातील सर्व पदाधिकारी, मान्यवर मंडळी, सन्माननीय ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या