🌟पुर्णा बनले डिझेल घोटाळ्याचे केंद्रबिंदू ? स्थानिक गुन्हे शाखेने पकडला काळ्या बाजारात जाणारा रेल्वेचा डिझेल टॅंकर...!


🌟पुर्णा रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्यास मोठे गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता🌟 

पुर्णा (दि.३० जानेवारी) - मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून परिचित असलेल्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर डिझेल डेपोसह 'फिलिंग पॉईंट' असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागा अंतर्गत या लोहमार्गावरुन धावणाऱ्या प्रवासी एक्सप्रेस/पॅसेंजर गाड्यांसह मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या डिझेल इंजिनमध्ये या ठिकाणाहूनच डिझेल भरल्या जाते त्यामुळे सातत्याने या ठिकाणी डिझेल टॅंकरद्वारे डिझेलचा पुरवठा होत असतो परंतु मागील अनेक वर्षांपासून या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील 'फिलिंग पॉईंट' वरुन डिझेल टॅंकर चालक व काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून मोठ्या प्रमाणात डिझेलची अफरातफर होत असल्याची कुणकुण रेल्वे कर्मचारी वर्गातूनच होतांना ऐकावयास मिळत होती त्या चर्चेला पुष्टी देणारी घटना काल सोमवार दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास परभणी-गंगाखेड-ताडकळस राज्यमार्गावरील सिंगणापूर फाट्यालगत घडल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासनात खळबळ माजली असून परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पुर्णेहून सिंगणापूरकडे येणारा रेल्वेला डिझेल पुरवठा करणारा टॅंकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हा थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात पुर्णा जंक्शन येथील डिझेल डेपोतून डिझेल खाली करुन परतीच्या प्रवासात जातांना काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अंदाजे साडेचार पाच हजार लिटर डिझेलचा साठा शिल्लक घेऊन जात असल्याचे स्थागुशाने पथकास  निदर्शनास आल्यानंतर पथकाने टॅंकरसह चालकास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दैठणा पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले.

या घटने संदर्भात दैठणा पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून सदरील डिझेल टॅंकरसह डिझेलसाठा दक्षिण मध्य रेल्वे विभागातील पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोचा असल्यामुळे पुर्णा रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल प्रशासनाने टॅंकर चालक संदिप आनंदराव पांढरे वय ४० वर्ष राहणार माळसिरस जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात रेल्वेच्या विशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून या घटने संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी नेहमी प्रमाणे प्रसार माध्यमांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत असून सदरील प्रकरणाची सखोल चौकी सिबीआय कडून झाल्यास फार मोठे गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या