🌟पुर्णेत अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य श्रीराम शोभायात्रा संपन्न....!


🌟श्रीराम जन्मोत्सव समितीकडून आयोजित शोभायात्रेत माता/भगिनींसह युवक भाविकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग🌟 


पुर्णा (दि.२१ जानेवारी) - 'माझे शहर माझी अयोध्या' या संकल्पांतर्गत अयोध्येतील रामजन्मभूमी स्थळावर उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात आज २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मोत्सव समिती पुर्णाच्या वतीने पुर्णा शहरात देखील आज दि.२२ जानेवारी रोजी 'उत्सव अस्मितेचा सोहळा परंपरेचा साजरा करण्याच़्या दृष्टीने शहरातील आनंद नगर परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातून सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास प्रभु श्रीराम प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. 


श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित या भव्य शोभायात्रेस आनंद नगरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे सन १९९० व १९९२ यावर्षी श्रीराम जन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा हृदयस्पर्शी सन्मान करीत प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पुजन करुन सकाळी ०९-०० वाजेच्या सुरुवात करण्यात आली ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत माता/भगिनी पारंपरिक पद्धतीने भंगव्या साड्या वृद्ध महिला लुगडे तर अबालवृद्ध युवक कुर्ता पायजमा परिधान करून सहभागी झाले होते.


 सदरील शोभायात्रा शहरातील आनंद नगर परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आल्यानंतर येथील रामभक्तांनी मिरवणुकीत सहभागी भाविकांना खिचडी प्रसादाचे तर शोभायात्रा सुमन मंगल कार्यालय परिसरात गेल्यानंतर शहाणे क्लाथ सेंटरचे मालक सचिन शिवदास शहाणे यांच्यावतीने शोभायात्रेतील भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले तर महावीर नगर चौकालगत शोभायात्रा पोहोचल्यानंतर माजी नगरसेवक अशोक जैस्वाल यांच्यावतीने खिचडी प्रसादाचे तर निलेश जैस्वाल कुटुंबाच्या वतीने भाविकांना पाणी वाटप करण्यात आले या शोभायात्रेच्या स्वागतासाठी माता-भगिनिंनी आपआपल्या घरासमोर व व्यवसायीक प्रतिषठांनांसमोर सड़ा टाकून सुंदर अश्या रांगोळ्या काढल्या होत्या तर सराफा बाजारातील मारोती मंदिरात श्रीराम भक्तांनी श्री हनुमान चालीसाचे सामुहिक पठन केले सदरील शोभायात्रे दरम्यान रामभक्तांनी जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी केली तर यावेळी शोभायात्रेत सहभागी युवकांनी दिलेल्या जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला होता.

दरम्यान शोभायात्रा महात्मा श्री बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आल्यानंतर येथेही शोभायात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले यानंतर शोभायात्रा सराफा बाजार,मोठा मारोती मंदिर,शहिद सरदार भगतसिंग चौक, छत्रपती शिवाजी महाराज नगर (महादेव मंदिर) परिसर, श्री गुरु बुध्दीस्वामी मठसंस्थान परिसर, शुरवीर महाराणा प्रतापसिंह चौक,श्री दत्त मंदिर परिसर या मार्गाने मार्गक्रमण करीत ही भव्य शोभायात्रा जुना मोंढा परिसरात पोहोचल्यानंतर शोभायात्रेची सांगता करुन येथील श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामचंद्रांची महाआरती झाली यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा हजारो रामभक्तांनी लाभ घेतला सदरील भव्य शोभायात्रेत न भुतो ना भविष्यती असा हिंदु समाज प्रचंड संख्येने सहभागी झाला होता.


***********"***********"*********"***********

🌟पुर्णेतील कुंभार गल्ली परिसरातील मोठा मारोती मंदिरात श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना:


पुर्णा शहरातील कुंभार गल्ली परिसरातील प्राचीन काळातील मोठा मारोती मंदिरात आज सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येतील ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून प्रभु श्रीराम माता सिता व लक्ष्मणाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी परिसरातील माता भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या