🌟पुर्णा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी/लोकप्रतिनिधींसह पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पडला दर्पण दिनाचा विसर....!


🌟त्यांच्या नजरेत शहरासह तालुक्यातील पत्रकार कदाचित सन्मानास पात्र नसावे असेच म्हणावे लागेल🌟

महाराष्ट्रातील जनसामान्यांसह समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने ०६ जानेवारी १८३२ यावर्षी मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले त्या दिवसाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी राज्यातील पत्रकार 'दर्पण दिन' ६ जानेवारी हा दिवस "मराठी पत्रकार दिन" म्हणून सर्वत्र साजरा करीत असतात.

राज्यात दोन शतकांपूर्वी तत्कालीन इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात जनजागृती व्हावी याकरिता मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ०६ जानेवारी रोजी पहिल्या 'दर्पण' नावाच्या मराठी वर्तमानपत्राची सुरुवात केली हा दिवस म्हणजे मराठी भाषिक पत्रकारांसाठी सन्मानाचा दिवस समजला जातो परंतु निष्पक्षपाती सत्याची कास धरुन निर्भिडपणे पत्रकारीता करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांना सन्मान देण्याइतपत लायकी नसलेल्या पुर्णा तालुक्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह खाजगी शैक्षणिक संस्था महाविद्यालय तसेच सर्वपक्षीय राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यालयात देखील संबंधित महाभागांनी पत्रकारांना एखादे गुलाबाचे फुल देऊन सन्मानित करणे तर सोडाच मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला साधा एखादा दहा/विस रुपयांचा पुष्पहार देखील अर्पण करुन अभिवादन करण्याचे सौहार्द दाखवले नाही ही निश्चितच लज्जास्पद बाब म्हणावी लागेल.

पुर्णा शहरासह तालुक्यात पुर्णा/चुडावा/ताडकळस या तिन पोलीस स्थानकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,पुर्णा तहसिल कार्यालय,पुर्णा पंचायत समिती कार्यालय, पुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय पुर्णा,पुर्णा तालुका वनविभाग कार्यालय,महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालय पुर्णा या १० मुख्य शासकीय कार्यालयांसह महसुल विभागाशी संबंधित ०६ मंडळ कार्यालय व ३४ तलाठी सज्जा कार्यालयांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पुर्णा,जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पुर्णा तसेच ०४ खाजगी महाविद्यालय व ०४ नामांकित शिक्षण संस्थांसह सर्वपक्षीय राजकीय पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यालय आदींमधील एकाही कार्यालयात दि.०६ जानेवारी २०२४ रोजी दर्पण दिन अर्थात "मराठी पत्रकार दिन" मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला एखादा दहा/विस रुपयांचा पुष्पहार अर्पण करून शासकीय स्तरावर साजरा करण्याची तसदी एकाही अधिकारी/कर्मचाऱ्यांने दाखवली नाही शहरात केवळ कॉंग्रेस पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा कॉंग्रेस सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल भैय्या धामनगावे व पुर्णा तालुका कॉंग्रेस पक्षाचे नुतन तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे,पुर्णा तालुका कॉंग्रेस पक्षाचे तालुका संघटक राजू गायकवाड यांनी दि.०६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास नगर परिषद प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मोठ्या उत्साहात मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्पण दिन अर्थात मराठी पत्रकार दिन साजरा करीत शहरातील पत्रकारांना पुष्पगुच्छ व पेन देऊन आदरपूर्वक सन्मानित केले तर याच सभागृहात सायंकाळी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शहर व तालुका शाखेच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून भव्य स्वरूपात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या व्यतिरिक्त तालुक्यातील एकाही शासकीय/निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्था महाविद्यालय तसेच सर्वपक्षीय राजकीय पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात न आल्याने आला नसल्यामुळे मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह दर्पण दिनाचे महत्त्व संबंधितांना कदाचित अद्यापही कळले नसावे किंवा त्यांच्या नजरेत शहरासह तालुक्यातील पत्रकार कदाचित सन्मानास पात्र नसावे असेच म्हणावे लागेल......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या