🌟परभणी जिल्ह्यात अयोध्येतील श्री रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिनी २२ जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर....!


🌟महाराष्ट्र शासनाने त्या दिवसी शासकीय सुट्टी देण्याचे जाहीर केले🌟

परभणी (दि.१९ जानेवारी) : उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या नवनिर्मित मंदिरात सोमवारी दि.२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २२ जानेवारी या दिवसी शासकीय सुट्टी देण्याचे जाहीर केली आहे.


   या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी पत्र काढले असून यामुळे शासकीय कर्मचार्‍यांना श्री रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा दूरचित्रवाणी पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद ही घेता येणार आहे. या आदेशाची प्रत सर्व जिल्हाधिकारी व तर शासकीय विभागाना पाठविण्यात आली आहे. ही सुट्टी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनुसार देण्यात येत असल्याचेही सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रो. दी. कदम पाटील यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या