🌟देशभक्ती व निरपेक्ष समाज सेवेला वाहून घेतलेल शहीद सरदार उधमसिंग फाउंडेशन....!


✍🏻लेखक : श्री.श्रीकांत हिवाळे सर पुर्णा 


🌟सामाजिक/शैक्षणिक/प्रशासकीय/राजकीय/व्यापार उद्योग व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा केला जातो फाऊंडेशनच्या वतीने सन्मान🌟 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन येथील निर्भिड पत्रकार जंग-ए-अजित न्यूजचे मुख्य संपादक दिनेश चौधरी यांच्या दूरदृष्टी व व्यापक संकल्पनेतून निकोप समाज निर्मितीसाठी जाज्वल्य देशभक्ती देशासाठी समर्पण आदर्श समाज निर्मिती साठी थोर देशभक्त शहिद सरदार उधमसिंग यांच्या नावे "शहीद सरदार उधमसिंग फाउंडेशन महाराष्ट्र " ची स्थापना केली.ज्या मध्ये नांदेड येथील प्रसिद्ध समाज सेवक सरदार रविंदर सिंग मोदी उपाध्यक्ष सरदार हरदयाल सिंघ संधू पुणे यांचा समावेश आहे.

समाजाच्या प्रती आपल काही देणं आहे ज्यांच सामाजिक शैक्षणिक व्यापार प्रशासकीय कृषी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे ज्यांनी न्याय निती सदचार कठोर परिश्रमाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्या क्षेत्रात नेत्रदीपक कार्य केले आहे अशांचा यथोचित सन्मान दर वर्षी शहिद सरदार उधमसिंग फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने दिनांक 6 जानेवारीला दर्पण दिनाचं औचित्य साधून समारंभ पूर्वक केलं जातं.

या अगोदर व्यापार उद्योग मध्ये पूर्णा शहरा मध्ये प्रामाणिक व दर्जेदार सेवा देणारे आदरणीय नेमीचंद  खिवांसरा  पूर्णा नगरपालिकाच्या तत्कालीन विकासाभिमुख नगराध्यक्ष लक्ष्मीबाई कदम पोलीस प्रशासन मध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्तापित करून आपल्या कर्तुत्वाचा अमीट ठसा उमटवणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक मा.शंकर सिटीकर जुन 2018 मध्ये धार्मिक व सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे सरदार मनप्रीत सिंघ कुंजी वाले संस्थापक अध्यक्ष हुजुरी क्रांती दल नांदेड,व्यापार क्षेत्रामध्ये दिवंगत आदरणीय निष्काम कर्मयोगी सिताराम आप्पा एकलारे अध्यक्ष व्यापारी महासंघ पूर्णा सामाजिक क्षेत्रात चरित्र संपन्न आरोग्य  संपन्न तरुणाईचं संघटन निर्माण करण्यात ज्यांच मोठ योगदान आहे असे मावळचे पैलवान तानाजी जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र व पोलिस प्रशासनामध्ये आपल्या कर्तुत्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक माननीय सुनील ओव्हाळ साहेब पूर्णा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये  आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे सर्वधर्मसमभाव व सामाजिक सद्भभाव प्रस्थापित करून पूर्णा शहराचा सर्वांगीण विकास करणारे नगराध्यक्ष प्रतिनिधी माननीय संतोष भाऊ एकलारे पूर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विकासाची दूरदृष्टी लाभलेले माननीय विशाल कदम प्रशासकीय क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या तत्कालीन तहसीलदार पल्लवी टेमकर तत्कालीन मानवतेचा स्पर्श असलेले कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुभाष राठोड पूर्णा शहरांमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युवक प्रवर्तक महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यता मिळवून देऊन या रोमहर्षक  पुतळा अनावरण  सोहळ्याला उपस्थित राहून सर्वोत्तपरी सहकार्य केल्याबद्दल परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना मानपत्र देऊन कला क्षेत्रामध्ये टाकाऊ लोखंडापासून कौतुकास्पद कलाकृती निर्माण करणारे पूर्णा येथील कलावंत शेख अलीम (संगम गॅरेज), व्यापार क्षेत्रात प्रतापसिंह खानचंदानी आदी महनीय सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणारे समाजा समोर दीपस्तंभा प्रमाणे कार्य करणारे यांचा पूर्णा शहरांमध्ये शाल पुष्पहार सन्मानचिन्ह देऊन समारंभपूर्वक दर्पण दिनी  यथोचित सत्कार केला जातो. दिल्ली येथील दैनिक जागरणचे तत्कालीन पत्रकार तथा आम आदमी पार्टीचे दिवंगत आमदार सरदार जरनेलसिंग जेरी यांचा महाराजा रणजीत सिंग यात्री निवास नांदेड सन्मानपत्र देऊन भावपूर्ण सन्मान केला.

दरवर्षी दिनांक सहा जानेवारी पत्रकारितेतील दिपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन या नावाने साजरा केला जातो.यावर्षी पूर्णा शहरांमध्ये नगरपालिका सभागृहामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्याच्या कर्तव्य परायण पोलिस अधिक्षक आदरणीय रागसुधा आर.यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका व शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रचे अर्ध यु अजित न्यूज च संपादक दिनेश चौधरी यांच्या कल्पतेतून हा कार्यक्रम साकारत आहे .

त्यांच्या मानवतेला समर्पित या कार्यास हार्दिक शुभेच्छा. ...!

श्रीकांत हिवाळे सर

पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या