🌟गंगाखेड शहरातील पूजा मंगल कार्यालयात ३०२ कामगारांना सुरक्षा किटचे थेट वाटप......!


🌟आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कामगारांना सुरक्षा किटचे वाटप🌟 


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज गंगाखेड शहरातील पूजा मंगल कार्यालयात ३०२ कामगारांना सुरक्षा कीटचे थेट वाटप करण्यात आले. 


सर्वसामान्य कामगार बंधु आणि भगिनींना दैनंदिन कामात मदत व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने हि कीट कामगारांना मोफत दिली जाते. अंगमेहनत करणाऱ्या कामगार बांधवांना या सुरक्षा कीटमुळे मोलाची मदत होत आहे. त्यामुळे तब्बल ३०२ लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. दररोज लागणाऱ्या आवश्यक वस्तुंची कीट मिळाल्याने कामगार सुध्दा आनंदी होत आहेत. सामान्य घटकांचा विचार करून शासनाने हाती घेतलेली हि योजना निश्चित दुरदृष्टीचे उदाहरण आहे, असे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी म्हटले. 

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रल्हादराव मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष अँड. संदीप अळनुरे, तहसिलदार प्रदिप शेलार, गट विकास अधिकारी जयराम मोडके, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभुदेव मुंडे, माजी नगरसेवक नागनाथ कासले, बालासाहेब ढोले, वैजनाथराव टोले, उध्दव शिंदे, संदीप राठोड, संतोष पेकम, प्रताप मुंडे, संजय पारवे, पत्रकार पिराजी कांबळे, चंद्रकांत  गायकवाड यांच्यासह जमलेले सर्व बांधकाम कामगार व माता-माऊली मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या