🌟नांदेड येथील अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा चौथा दिवस.....!


🌟कस्टम मुंबई,कोलकाता,पंजाब पोलीस आणि औरंगाबाद विजयी : नासिक आणि एमपीटी मुंबईचा सामना अनिर्णीत🌟


(
हवडा डिवीजन कोलकाता आणि साईं बिलासपुर संघादरम्यान संघर्षाचे क्षण)

नांदेड (दि.13 जानेवारी) : अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात चुरशिच्या लढती बघायला मिळाल्या. यात कस्टम मुंबई, हावडा डिवीजन कोलकाता, पंजाब पोलीस, साईं एक्सेलेंसी औरंगाबाद संघानी विजयी रथ पुढे नेला. तर आजचा पहिला सामना आर्टलरी सेंटर नासिक आणि एमपीटी मुंबई यांच्यात झाला. कोणताही संघ गोल करू शकला नाही त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.


आजचा दूसरा सामना कस्टम मुंबई विरुद्ध सुफियाना क्लब अमरावती संघादरम्यान झाला. अटितटीच्या या सामन्यात कस्टम मुंबई संघाने अमरावती संघाचा 2 विरुद्ध 1 गोलाने पराभव केला. मुंबईच्या इक्तिदार इशरत ने 2 गोल साधले. तर अमरावती संघाच्या आमीर खान ने 1 गोल केला.

आजचा तीसरा सामना हावडा डिवीजन कोलकाता आणि साईं एक्सेलेंसी बिलासपुर संघादरम्यान खेलविण्यात आला. कोलकाता संघाने 2 विरुद्ध 1 गोल अंतराने बिलासपुर संघाला नमविले. कोलकाता संघातर्फे विकास लाकरा ने दोन गोल केले. बिलासपुरच्या शादाब अहमदने एक गोल केला.

आजचा चौथा सामना पंजाब पोलीस विरुद्ध ऑरेंज सिटी नागपुर संघादरम्यान खेळण्यात आला. पंजाब पोलीस संघाने 3 विरुद्ध 2 गोल अंतराने ह्या सामन्यात विजय मिळवला. पंजाबसाठी वरिंदरसिंघ याने 2 गोल आणि करणबीरसिंघ याने एक केला. नागपुर तर्फे प्रशांत तोड़कर आणि अभयसिंह परिहार याने प्रत्येकी एक गोल केला.

आजचा पाचवा सामना साईं एक्सेलेंसी औरंगाबाद आणि खालसा यूथ क्लब नांदेड यांच्यात खेळला गेला. औरंगाबाद संघाने 3 विरुद्ध 2 गोल अंतराने हा सामना जिंकला. औरंगाबाद तर्फे हर्षदीपसिंघ याने 1 आणि सजल याने 2 गोल केले. तर खालसा यूथ क्लब तर्फे मोनिश आणि अर्जुन याने एक - एक गोल केला.....

(रविंद्रसिंघ मोदी)

9420654574

........

फोटो :  

फोटो : मुनावर खान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या