🌟पूर्णा शहरामध्ये दि.१४ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याचे आयोजन....!


🌟या कार्यक्रमाचे आयोजक मा.उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे तर स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध युवा उद्योजक रवी वाघमारे हे आहेत🌟

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त तथागत मित्र मंडळ पूर्णाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्यभदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत व पय्यावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख वक्ते व सत्कारमूर्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य साधने समितीचे महाराष्ट्र शासनाचे सदस्य सचिव सुप्रसिद्ध विचारवंत भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक डॉ प्रदीप आगलावे नागपूर हे असणार आहे.या कार्यक्रमांमध्ये तथागत मित्र मंडळाचा सन्मानाचा पॅंथर रत्न पुरस्कार पॅंथर नेते व दैनिक रिपब्लिकन गार्डचे संपादक समाजभूषण विजय सोनवणे यांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार पूर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार अजित न्यूज चे संपादक दिनेश चौधरी यांना देण्यात येणार आहे. नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक डॉ. मुरलीधर इंगोले यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध युवा उद्योजक रवी वाघमारे हे आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत पॅंथर नेते प्रकाश कांबळे  यादव रावजी भवरे प्राचार्य मोहनराव मोरे संतोष एकलारे राजू खरात राजकुमार येंगडे गौतम मोगले हाजी कुरेशी जाके र कुरेशी प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे प्राचार्य डॉक्टर राजकुमार  प्राचार्य राम धबाले लक्ष्मण शिंदे श्रीकांत हिवाळे प्रमुख उपस्थिता मध्ये नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे दादाराव पंडित रेखाताई         खरग खराटे एडवोकेट हर्षवर्धन  गायकवाड मधुकर गायकवाड देवराव दादा खंदारे अखिल अहमद अशोक धबाले सुनील कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 14 जानेवारी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आव्हान तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे मित्र मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत हिवाळे प्रथम मित्र मंडळाचे पदाधिकारी मनोज खिल्लारे  प्रवीण कनकुटे धम्मा खंदारे विशाल भुजबळ शिवा हातागळे सुबोध खंदारे प्राध्यापक गौतम गायकवाड अलोक भगत आदींनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या