🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी बुधवार दि.१० जानेवारी रोजी जागेवर निवड संधी.....!


🌟इन्सुरन्स अडव्हायझर,कॉम्पूटर ऑपरेटर,ऑफिस रिसेप्शनिष्ट,हॉस्टेल वॉर्डन,कूक,शिपाई या पदाकरीता जागेवर भरती🌟 

परभणी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय तंत्र प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळाव्यामध्ये उद्योजक, तंत्र प्रशाला, नारायण चाळ येथे बुधवार दि.10 जानेवारी रोजी जागेवर निवडसंधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेअंतर्गत एलआयसी परभणी आणि टुटर अकॅडमी परभणी मध्ये इन्सुरन्स अडव्हायझर, कॉम्पूटर ऑपरेटर, ऑफिस रिसेप्शनिष्ट, हॉस्टेल वॉर्डन, कूक, शिपाई या पदाकरीता भरती करण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी  क्रमांक 02452-220074 वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या