🌟पुर्णा तालुक्यात दुग्ध व्यवसायातून धवल क्रांती व्हावी यासाठी अविरत धडपडणारे व्यक्तीमत्व सुरेश शिंदे....!



🌟भविष्यात दुधाचे विविध प्रकार तयार करण्याचा मोठा प्रकल्प थाटण्याचे देखील सुरेश शिंदे यांचे स्वप्न🌟

(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कृषी पुरक उद्योग क्षेत्रातील 'समाज भुषण' श्री सुरेश शिंदे)


'मान्यवरांच्या हस्ते समाज भुषण हा सर्वोच्च सन्मान स्विकारताना श्री सुरेश शिंदे'

लेखक - चौधरी दिनेश (रणजित)

पुर्णा तालुक्यात संत तुकाराम महाराज दुध डेअरीची स्थापना करुन या दुध डेअरीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातून धवल क्रांती व्हावी यासाठी अविरत धडपडणारे धाडसी व्यक्तीमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे सुरेश नामदेवराव शिंदे यांचा तमाम पुर्णेकरांना सार्थ अभिमान वाटतो.

पुर्णा तालुक्यातील बरबडी सारख्या छोट्याश्या खेड्यात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला चार दोन दुभत्या जनावरांच्या भरवशावर त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरूवात केली जिद्द व शेतीपुरक व्यवसाया शिवाय शेतकरी सुखी होणार नाही या विचारधारेतून त्यांनी शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे जादा कसे मिळतील यासाठी त्यांनी पुर्णा शहरात संत तुकाराम महाराज दुध डेअरीची स्थापना केली त्यांच्यातील प्रामाणिकपणा व शुध्द हेतू व कष्ट करण्याची जिद्द यामुळे ते दररोज हजारों लिटर दूध संकलन व विक्री तंत्रशुद्ध पद्धतीने दुधात भेसळ होणार नाही याची दक्षता घेत ते करतात त्यामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यात नावलौकिक वाढले ग्राहकांना दर्जेदार ताजे व शुद्ध दुध पुरवठा ते करतात व अतिरिक्त दुध तेलंगणा राज्यात पाठवतात.

एवढ्या पुरतेच त्यांचे काम सिमित नाही तर जनावरांची निगा, आजार विविध प्रजातींची माहिती आपण शेतकऱ्यांना सातत्याने देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असतात त्याच बरोबर ते दुधावर प्रक्रिया करीत दही,खवा,पणीर,पेढे तयार करून विकतात त्यामुळे संपूर्ण तालुक्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते ही बाब हेरून भविष्यात दुधाचे विविध प्रकार तयार करण्याचा मोठा प्रकल्प थाटण्याचे देखील त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नांना व शेतीपुरक व्यवसायाला दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या वतीने शतशः हार्दिक शुभेच्छा....

टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या