🌟परभणी येथील राजाराम सभागृहात सोनार महिला मंडळाचा मकरसंक्रांती सणानिमित्त हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न...!


🌟या कार्यक्रमाचे आयोजन सोनार महिला मंडळाच्या अध्यक्षा शिवसेनेच्या नेत्या सौ.अंबीका अनिल डहाळे यांच्या वतीने आयोजन🌟

परभणी (दि.२४ जानेवारी) : परभणी येथील गांधी पार्कातील राजाराम सभागृहात मकरसंक्रांती सणानिमित्त येथील सोनार महिला मंडळाच्या वतीने काल मंगळवार दि.२३ जानेवारी २०२४ रोजी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           या कार्यक्रमाचे आयोजन सोनार महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा शिवसेनेच्या नेत्या सौ. अंबीका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात आला होता यावेळी सौ.संध्या शहाणे, सौ. मंजूषा डहाळे, सुचित्रा शहाणे, संगीता टेहरे, निर्मला डहाळे, सीमा टाक, कल्पना अंबिलवादे, जयश्री टेहरी, अमृता कुलथे, वैशाली डहाळे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. हिंदु धार्मिक परंपरा आणि रितीरिवाज नवीन पिढीला कळाल्या पाहिजेत, म्हणून सोनार महिला मंडळाच्या वतीने यावेळी ऊस आणि हळद यांचे लग्न लावण्यात आले.  दरम्यान, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या सोहळ्यास भेट दिली......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या