🌟परभणी उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून संभाजी नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची नियुक्ती...!


🌟राज्याच्या महसूल व वन विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदलीने पदस्थापना जाहीर केल्या🌟 

परभणी (दि.23 जानेवारी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या महसूल व वन विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदलीने पदस्थापना जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे परभणीतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी या रिक्त पदावर छत्रपती संभाजी नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव व लातूर याही ठिकाणी उपजिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या