🌟व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने पत्रकारांसाठी शुक्रवार दि.०५ जानेवारी आरोग्य तपासणी व उपचार शिबिर....!


🌟पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी पहिल्यांदाच आरोग्य शिबिराचे आयोजन🌟


परभणी : बातमीच्या धावपळीत पत्रकार स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष देणं होत नाही. या गोष्टीची दखल घेत व्हाईस आॅफ मीडिया व आरपी हॉस्पीटल व रिसर्च सेंटर परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी पहिल्यांदाच महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल (एमबीबीएस कॉलेज) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. या शिबिरातील काही तपासण्या उपाशी पोटी कराव्या लागणार असल्यामुळे सर्वांनी चहा ही न घेता उपाशीपोटी तपासणीला यावे असे आवाहन व्हॉईस आॅफ मिडीया संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी पहिल्यांदाच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरात पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये लिक्वीड प्रोफाईल शुगर, बीपी ह्रदयरोग, कोलेस्ट्रॉल, दात,कान, नाक, घसा, डोळे, हाडे (एक्सरे), हाडातील कॅल्शियम, त्वचा, खाज, थॉयराईड इत्यादी तपासण्या केल्या जाणार आहेत. शिवाय महिलांशी संबंधित टिएफटी हार्मोन चेंजेस, पीसीओडी, पोटाचे विकार, शरीरावरील गाठी इत्यादी तपासण्या केल्या जाणार आहेत. या शिबिरात कुणाला काही आजार असल्यास तात्काळ त्यावरील औषधोपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ व्हॉईस आॅफ मिडीया संघटनेच्या व्यतीरिक्त इतरही पत्रकार, छायाचित्रकार यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

तत्पूर्वी शिबिरात तपासणीसाठी येऊ ईच्छित असणाºयांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.  या शिबिरात येणाºया पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी पुर्वी काही आजार असल्यास त्या संबंधीची कागदपत्रे सोबत घेवून यावे. या शिबिरात भाग घेण्यासाठी प्रत्येक तालुकाध्यक्षाकडे तालुक्यातील पत्रकारांना नाव नोंदणी करता येणार आहे, सर्व पत्रकार प्रदिप कांबळे यांच्या ९०२८१०८७५६ या क्रमांकावर फोन करून आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन व्हॉईस आॅफ मिडीया संघटनेच्या वतीने केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या