🌟पुर्णा तालुक्यात समता सैनिक दलाच्या सैनिक जोडो अभियानाला जोरदार प्रतिसाद....!


🌟शहरासह ग्रामीण भागात आयोजित बैठकांमध्ये असंख्य तरुणांनी समता सैनिक दलात काम करण्याची इच्छा केली जाहीर🌟


पुर्णा : पुर्णा तालुक्यात समता सैनिक दलाच्या सैनिक जोडो अभियाना अंतर्गत काल मंगळवार दि.१६ जानेवारी २०२४ रोजी तालुक्यातील धानोरा मोत्या या गावी समता सैनिक दलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील असंख्य तरुणांनी समता सैनिक दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून लवकरच समता सैनिक दलाची यादी प्रदर्शित केली जाईल.


पुर्णा शहरासह ग्रामीण भागात देखील समता सैनिक दलाच्या सैनिक जोडो अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत असून धानोरा मोत्या येथील बैठकीस यावेळी समता सैनिक दलाचे सैनिक आनंद गायकवाड, राहुल कचरे,केशव मकासरे, प्रवीण कशिदे, सुनील मगरे या सर्व सैनिकांनी संबोधित केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या