🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या.....!


🌟पक्षांतर करण्यासाठी बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय ; असीम सरोदेंकडून थेट राहुल नार्वेकरांवर आरोप🌟

* जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!  राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत अॅड. असीम सरोदेंकडून चिरफाड,राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवल्याचा आरोप

* राहुल नार्वेकरांच्या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायको सुद्धा मान्य करणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल, अध्यक्षांची तिरडी निघणं महाराष्ट्रात कधीही घडलं नाही, राऊत कडाडले

* पक्षांतर करण्यासाठी बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय ; असीम सरोदेंकडून थेट राहुल नार्वेकरांवर आरोप,

* राहुल नार्वेकरांच्या प्रत्येक मुद्द्याची ॲड.असिम सरोदे यांच्याकडून चिरफाड 

 *."जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न"; महापत्रकार परिषदेवरुन शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंना टोला

* बाबरी मशीद पडल्यानंतर राजीव गांधींनी राम मंदिराचा निर्णय घेत शिलान्यास केला; शरद पवारांकडून भाजपला इतिहासाची आठवण ,  देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला*

* माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार ; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप,मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू, मंत्र्यांची Exclusive माहिती

* सोलापुरातील राजकीय वातावरण तापणार; पुढील चार दिवस राष्ट्रीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांचा सभांचा धडाका, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापुरात

* बारामतीमध्ये भाजपचं चांगलं काम, त्यामुळेच अजित पवार इकडे आले - गोपीचंद पडळकर*

* वेगरे गावच्या सरपंचपदाच्या वादाने ठिणगी पडली,शरद मोहोळच्या हत्येचा कट शिजला

*जयंत पाटलांना साथ द्या ,त्यांची उंची व त्यांचे काम मोठे, सन्मानाने जगायचं हा सांगली जिल्हाचा लोकांचा बाणा शरद पवारांनी सांगली करांना घातली भावनिक  हाक / भावनिक साद

* सध्या विचारांचे नाही तर वचपा काढण्याचे राजकारण सुरू आहे जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

* निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेच्या आधारावर आमदार अपात्रेचा निर्णय दिला -- राहुल नार्वेकर

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, व राहुल नार्वेकरांनी जनतेत यावं आणि विचारावं शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंचा घणाघात

* राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

* राहुल नार्वेकरांच्या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायको सुद्धा मान्य करणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

* माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसता शिव्याशाप दिल्या, राहुल नार्वेकराचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

* गडचिरोली पोलिसांची केली अनोखी कामगिरी, गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत उभे केले पोलिस स्टेशन

* तत्कालीन राज्यपाल फालतू माणूस, त्यांची भूमिका संशयास्पद होती, असीम सरोदे यांचा आरोप

* अयोध्येच्या सुरक्षेसाठी वापरलं जाणार एआय तंत्रज्ञान, अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजी तैनात केली जाणार

* अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला मिळालं अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं निमंत्रण

* पुन्हा एकदा ‘राणी भारती’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; महारानी-3 चा जबरदस्त टीझर रिलीज!

* ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला; सुमितने अलेक्जेंडर बुब्लिक याचा 3-0 ने पराभव केला

* 108 फूट लांब आणि 3500 किलो वजनी अगरबत्ती प्रज्वलित, श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष

* नायलॉन मांजा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या