🌟परळी वैजनाथ शहरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटूंबाचे सर्वेक्षण....!


🌟सर्वेक्षण राहिले असल्यास नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा - मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास सुरु असून हे सर्वेक्षण ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावयाचे आहे. तरी परळी वैजनाथ शहरातील कुटूंबाचे सर्वेक्षण राहिले असल्यास तात्काळ नगर परिषद कार्यालयाशी संपर्क करा असे आवाहन मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे. 

           राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारी २०२४ रोजी पासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास सुरु असून हे सर्वेक्षण ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावयाचे आहे. परळी वैजनाथ शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण नगर परिषदेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ समन्वयक, ८ पर्यवेक्षक आणि १२० प्रगणकांमार्फत सदरील सर्वे पूर्ण करण्यात येत आहे. ०२ फेब्रुवारी २०२४ ही सर्वेक्षणाची शेवटची तारीख आहे. शहरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचा सर्वे पूर्ण झालेला असून ज्या कुटुंबांचा सर्वेक्षण नजर चुकीने करायची शिल्लक राहिले असेल त्यांनी दि.०२ फेब्रुवारी पर्यंत समन्वयक पंकज दहातोंडे (99708 13154) यांच्याशी संपर्क साधावा. अशा राहिलेल्या कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ नगर परिषदेची टीम मार्फत येऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल असे आवाहन नगर परिषदेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांनी केले आहे.

*नागरिकांनी सहकार्य करावे-नगर परिषदेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे*

 राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे काम सुरु असून हे सर्वेक्षण ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावयाचे आहे. १ समन्वयक, ८ पर्यवेक्षक आणि १२० प्रगणकांमार्फत सर्वेक्षण सुरु आहे. तरी परळी शहरातील नागरिकांनी समन्वयक, पर्यवेक्षक व प्रगणक हे माहिती विचारून पूर्ण अचूक माहिती घेऊन घरोघरी जाऊन काम करत आहेत. त्यांना सर्वेक्षणाच्या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या