🌟परभणी जिल्हा परिषदेचे मा.सदस्य तथा झरीचे मा.सरपंच गजानन देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन...!


 🌟त्यांच्या पाच्यात आई,वडील,दोन भाऊ,भावजय,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा मोठा परिवार आहे🌟

परभणी (दि.२५ जानेवारी) - परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे धाडसी नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य झरीचे या.सरपंच गजाननराव देशमुख यांचे आज गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास परभणी तालुक्यातील झरी या त्यांच्या गावी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण झरी पंचक्रोशीसह तालुक्यात शोककळा पसरली आहे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देशमुख हे २००५ मध्ये गावच्या सरपंच पदी विराजमान झाले होते तसेच २०१२ व २०१७ या कालावधीत ते परभणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील निवडून आले होते झरी व पंचक्रोशीत ते गजू भाऊ या टोपण नावाने ओळखले जात. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे विशेष म्हणजे २४ तास दिवस रात्र  ग्रामस्थांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहत. अनेक गोरगरीबांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहकार्य तसेच भावकीतील,कुटुंबातील भांडण तंटे, वादविवाद अशे अनेक प्रकरणे ते हाताळत असत.

झरी चे चालते बोलते पोलीस स्टेशन म्हणून ते संबोधले जात.त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे झरीकरांना मोठा धक्का बसला आहे.कधी न भरणारी पोकळी झरी वासियांन मध्ये निर्माण झाली आहे त्यांच्या निधनाची माहिती कळताच सर्व बाजारपेठ तसेच खाजगी शाळा जिल्हा परिषद शाळा स्वयं स्फूर्तीने बंद होत्या.

दरम्यान त्यांच्या पार्थिवावर झरी येथील स्म्शान भूमी येथे आज गुरुवार दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ०४-०० वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पाच्यात आई,वडील, दोन भाऊ,भावजय,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधना मुळे सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या