🌟महाराष्ट्र राज्यखादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन....!


🌟जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बालाजी नारायण जायभाये यांनी केले आवाहन🌟 

परभणी (दि.११ जानेवारी) : महाराष्ट्र राज्यखादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हि योजना सन 2008 पासुन तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हि योजना सन 2019-20पासुन राबविण्यात येत आहे. राबविण्यात येते. केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (भारत सरकार) राबविण्यात येणारी योजना राज्यात खादी व ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मार्फत रु. 50 लाखापर्यंत राबविण्यात येते. ग्रामिण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन ग्रामिण व शहरी बेरोजगार तरुण वर्गाला व पारंपारिक कारागिरांना एकत्रित करुन स्थानिक पातळीवर स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करुन आणि  ग्रामिण भागात रोजगार वाढीस मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सर्वसाधारण संवर्गातील लाभार्थी 25 टक्के अनुदान व राखीव वर्गासाठी व महिलांसाठी 35 टक्के अनुदान आहे. ही योजना ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, त्याचे संकेतस्थळ www.pmegp.in , www.kviconline.gov.in, http://maha-cmegp.gov.in  हे आहे.

मध केंद्र याजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यन्वीत झाली आहे. या करीता पात्र व्यक्ति/संस्थाकडुन खालील दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येतात. मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वारुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्केस्वंगुतवणुक शासनाच्या हमी भावने मध खरेदी/ विषेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनमागृती करण्यात येते.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढील प्रमाणे असून यात  वैयक्तिक मधपाळकरीता अर्जदार साक्षर असावा स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळासाठी  किमान 10 वी पास वय वर्ष 21 पेक्षा जास्त व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुंटुबातील कोणत्याही व्यक्तिच्या नांवे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबती लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविध असावी. तसेच केंद्रचालक संस्थाकरीता  संस्था नोंदणीकृत असावी संस्थेच्या नांवे अथवा भाडे त्तवावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इतारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची/भाड्याने घतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकानां प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणे संबधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चिीत कलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी संपर्कासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. तळणीकर कॉम्प्लेक्स, आझम चौक, दर्गा रोड, परभणी. ई-मेल dvioparbhani@rediffmail.com मोबाईल क्रंमाक बालाजी नारायण जायभाये, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी 9822729526 या क्रमांकावर संपर्क साधवा असे अवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या