🌟परभणी येथील शारदा महाविद्यालयात वारी आणि तमाशाच्या छायाचित्रणाचा स्लाईड शो कार्यक्रम संपन्न....!


🌟या कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त तहसीलदार एन.जी खंदारे यांनी केले🌟

 परभणी : परभणी येथील शारदा महाविद्यालयात काल सोमवार दि.29 जानेवारी रोजी सायंकाळी 04.00 वाजेच्या सुमारास राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या वारी आणि तमाशाच्या छायाचित्रणाचा स्लाईडशो कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त तहसीलदार एन.जी खंदारे यांनी केले तर कार्यक्रमाची अध्यक्षता शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य शामसुंदर वाघमारे यांनी केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रफिक शेख, सुभाष जोगदंड, ह.भ.प.कृष्णा महाराज शेंद्रेकर यांची मनोगते झाली याप्रसंगी सर्व पाहुण्यांच्या हस्ते संघर्षमूर्ती बायजाबाई घोडे यांना संत जनाबाई संघर्षनाईका हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी बायजाबाई यांच्या मानपत्राचे वाचन नितीन सावंत यांनी केले. बायजाबाई घोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुरस्काराला उत्तर दिले. 

                क्रमाचे मुख्य  आकर्षण वारी आणि तमाशाच्या  फोटोग्राफीच्या स्लाईडशोचे होते. गेले तिस वर्षे झाले यावर कार्य करणारे संदेश भंडारे यांनी  सविस्तर मार्गदर्शन केले.माणुसकी शिकवणारी व भेदभाव विसरायला लावणारी वारी तर प्रचलित प्रश्नांवर आवाज उठवणारे, वग, लोकनाट्यातुन प्रबोधन करणारे कलाकार, शाहीर यांचे तमाशातील जगणे संदेश भंडारे यांनी  सर्वांच्या समोर ठेवले. वारी आणि तमाशा ह्या एकेकाळी प्रबोधनाच्या परंपराच होत्या  हे त्यांनी निदर्शनास आणुन दिले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सखाराम रणेर  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रामप्रसाद अंभोरे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावंत यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन ह भ प एकनाथ महाराज भालेराव,संतोष धोत्रे, रामप्रसाद अंभोरे, ह भ प  वैभव महाराज शेटे सूर्यकांत मोगल, भारत पवार,मुसेफ शेख,स्वप्निल कदम,शिवाजी बोबडे, काशिफ रजा,शेख अझर,आदींनी केले होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या