🌟परभणी जिल्ह्यात दि.२२ रोजी श्री प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मांस/मद्य विक्री बंद ठेवा...!


🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे साकडे🌟

परभणी (दि.१९ जानेवारी) : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दि.२२ जानेवारी २०२४ रोजी समस्त हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. समस्त हिंदु बांधवांकरीता हा एक ऐतिहासिक क्षण असून या दिवशी परभणी जिल्ह्यात सर्वत्र मांस व मद्यविक्री बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

            जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, श्रीनिवास लाहोटी,अर्जून टाक,लखन गरुड,श्रीकांत पाटील,प्रशांत टाक, सुर्यकांत मोगल, आशिष जैन आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या