🌟नांदेड येथे गोकुळ नगरातील शिवसेना शहर कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त आढावा बैठक संपन्न...!


🌟शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांच्या वतीने स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त आढावा बैठकीचे आयोजन 🌟

नांदेड (दि.२० जानेवारी) - नांदेड येथील गोकुळ नगर परिसरातील शिवसेना शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद ( बंडू ) खेडकर,उत्तर जिल्हा प्रमुख माधवराव पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पुर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शिवसेना नांदेड दक्षिण व उत्तर महानगराच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद ( बंडू ) खेडकर,उत्तर जिल्हा प्रमुख माधवराव पावडे,उपजिल्हा प्रमुख राम चव्हाण,जिल्हा संघटक नेताजी राव भोसले महानगर प्रमुख प्रदीप ( पप्पू ) जाधव,विधानसभा संघटक अविनाश देशमुख शहर प्रमुख गौरव कोटगिरे,दक्षिण शहर प्रमुख अर्जून सिंह ठाकुर,सिडको शहर प्रमुख अजित सिंह टाक,युवा सेना जिल्हा प्रमुख अक्षय वट्टमवार,युवती सेना जिल्हाप्रमुख प्रियंकाताई कुंभार,कामगार सेना जिल्हा संघटक ब्रिजलालजी उगवे आदींसह सर्व उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या