🌟परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे यांची देऊळगाव (दुधाटे) येथील जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट....!


🌟यावेळी शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले🌟

परभणी जिल्ह्याचे मा.अप्परजिल्हाधिकारी डाॅ.प्रताप काळे,मा. जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंदराव रणविणकर,मा.उप विभागीय अधिकारी गंगाखेड जिवराज डापकर,उप विभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे,पुर्णा तालुक्याचे तहसीलदार माधवराव बोथीकर व इतर मान्यवर मंडळींनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे माहेरघर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे या शाळेला दि.04 जानेवारी 2024 रोजी सदिच्छा भेट दिली.


यावेळी शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वर्गातील मुलांची गुणवत्ता पहिली,भौतिक सुविधा , सहशालेय उपक्रम,विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल रूम,सर्व बाबी पहिल्या व तसेच शैक्षणिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी अशी सुंदर शाळा जिल्हा परिषदेची आहे असे गौरवोद्गार काढले व पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी गावातील मान्यवर मंडळी व शिक्षकवृंद उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या