🌟परभणीचे ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू )कोल्हे यांचा अमृतमहोत्सवोत्तर वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा....!


🌟वाढदिवसानिमित्त पत्रकार मदन (बापू ) कोल्हे यांच्यावर दिवसभर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव🌟


परभणी - गेली पाच दशकापासून पत्रकारिता व समाज कार्यासाठी स्वतः ला वाहून घेतलेले जेष्ठ पत्रकार तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली चे परभणी जिल्हाध्यक्ष मदन (बापू )कोल्हे यांचा अमृत महोत्सवी वर्षानंतर चा वाढदिवस विविध उपक्रमाने दि.१७ जानेवारी २०२४ रोजी दिवसभर विविध संघटना,संस्थानी साजरा केला आहे.


सर्वप्रथम लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे मदनबापू फुले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि.१६ जानेवारी २०२४ ऱोजी सायंकाळी,धर्मभूमी कार्यालयात येऊन लोक स्वातंत्र्य पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख , पोलखोल चे संपादक भगीरथ बद्दर यांनी वाढदिवसानिमित्त मदन (बापू )कोल्हे यांना शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन व केक कापून थाटामाटात साजरा केला .परभणी जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार संघाचे अध्यक्ष .रुग्ण हक्क समिती परभणीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जी बनकर ,दैनिक लोकमंथन चे जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर सोनुणे ,सा.वैभव ज्वाला चे संपादक देवानंद वाकळे , रुग्णहक्क समितीचे उपाध्यक्ष सरफराज भाई , बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष पांचाळ ,फोटोग्राफर अग्रवाल यांनी शाल श्रीफळ देऊन मदन बापूंचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्य लाभण्याबद्दलच्या शुभेच्छा दिल्या तर परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गीत गाऊन मदन (बापू) ना शुभेच्छा दिल्या.


 सकाळी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल च्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष मदन (बापू ) कोल्हे यांना आजारपणातून अत्यंत मेहनतीने बरे केल्याबद्दल , त्यांच्या वाढदिवशी परभणी येथील  वैद्यकीय व्यवसाय सांभाळत, सामान्य माणसाच्या हितासाठी,समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे सुप्रसिद्ध तज्ञ डॉ. रामेश्वर नाईक यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाचे व मदन बापू चा वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन व भोजन वैभव ज्वाला' कार ,इंडियन रिपोर्टर असोसिएशन चे परभणी जिल्हा मीडिया चीफ देवानंद वाकळे यांनी केले होते त्यानंतर परभणी येथील सिमला लाॅज परिसरामध्ये ,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन परभणीच्या परिवारातर्फे मदन बापू कोल्हे  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .परभणी तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम यांनी मदन बापू यांचे स्वागत करून सत्कार केला व उपस्थितांना फराळ व चहा पान केले.

दुपारी दोन वाजता संबोधी अकादमी महाराष्ट्र तर्फे समाज भूषण भीमराव हत्तीअंबीरे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक यांच्या मार्गदर्शनात संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र व संबोधी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या धार रोड  परभणी  येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये अमृतमहोत्सवी वर्षानंतर मदन (बापू )कोल्हे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप यांनी संबोधी परिवारातर्फे मदन (बापू )यांना केक भरवुन वाढदिवस साजरा केला .यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा साहित्यिक दि.फ.लोंढे, मुख्याध्यापक ए.एम.मालसमिंदर ,हर्ष नगरीचे संपादक संघपाल अढागळे , दैनिक लोकमंथन चे जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर सोनुणे ज्येष्ठ पत्रकार विजय कुलदीपके ,वैभव ज्वालाचे संपादक देवानंद वाकळे ,सारीपुत्र ,शिक्षक वृंद उपस्थित होते 

नंतर संध्याकाळी पाच वाजता समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी यांचे वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना  मदन(बापू )कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप करण्यात आले ,हा कार्यक्रम समाजहित अभियान प्रतिष्ठाण परभणीचे संस्थापक अध्यक्ष ,कार्याध्यक्ष दयावान सरकार महाराष्ट्र राज्य,सदस्य भीमा कोरेगाव मित्र मंडळ ,परभणी जिल्हा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे सचिव प्रमोद अशोक आंबोरे यांचे वतीने करण्यात आला होता .यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे सचिव रमेश घनगाव ,भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  संदिप वायवळ ,सामाजिक कार्यकर्ते हरदिपसिंग, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भालेराव ,सिद्धांत सूर्यवंशी, ,प्रेम तुपसमुद्रे आदींची उपस्थिती लाभली होती

याशिवाय मोबाईल वरून सोशल मीडियाद्वारे मदन (बापु) यांना वाढदिवसानिमित्त दिवसभर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या