🌟भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या मराठवाडा अध्यक्षपदी स.गुरुदीपसिंग कुलदीपसिंघ संधू यांची निवड....!


🌟स.गुरुदीपसिंग कुलदीपसिंघ संधू यांचा नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला सत्कार🌟 


नांदेड (दि.२४ जानेवारी) - नांदेड येथील शिख समाजातील तरुण तडफदार नेतृत्व तथा सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरुदीपसिंघ कुलदीपसिंग संधू यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चा शिख समाज मराठवाडा अध्यक्षपदी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी निवड जाहीर केली सरदार गुरुदीपसिंग संधू यांच्या भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या मराठवाडा अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल आज बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांना आपल्या संपर्क कार्यालयात बोलावून त्यांचा जंगी सत्कार केला.


या संत्कार सोहळ्या प्रसंगी डॉ.सचिन पाटील उमरेकर,सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंघ खालसा,सरदार जगदीपसिघ नंबरदार,अकबर पठाण,सरदार अमरजीतसिंघ कुंजीवाले,सरदार तेगासिंघ ग्यांनी, सरदार हरप्रीत सिंघ पुजारी,सरदार जगराजसिंघ संधू,सरदार हरप्रीत सिंघ हॉटेलवाले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सरदार गुरुदीपसिंघ संधू यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या