🌟 महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या संविधनामुळेच मला संसदेत जाण्याची संधी मिळाली - खा.इम्तियाज जलील


🌟पुर्णेत आयोजित २२ व्या संविधान गौरव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना खा.इम्तियाज जलील म्हणाले🌟 


पुर्णा : डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान असेल तर देश टिकेल असे विचार एमएमआयचे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांनी २२ व्या संविधान गौरव सोहळ्याचे उदघाटन करतांना व्यक्त केले.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे हे होते.


पुर्णा व शहरात आयोजित दोन दिवसीय संविधान गौरव सोहळ्याचा प्रारंभ दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौल यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी पूज्य भदंत पय्यावंश यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील प्रदान केले.तर प्रा.अशोक कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.या प्रसंगी विविध पक्ष संघटना शहरातील सर्व महिला मंडळांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता  डॉ.आंबेडकर नगर येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथील ध्वजारोहण बेंगलोरचे भंते बोधी धम्मा यांचे हस्ते झाले तेथून चंदेरी रथात डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची व भारतीय संविधान ग्रंथाची भव्य मिरवणूक वाद्यवृंधा सह काढण्यात आली.या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम आणि नगराध्यक्षांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांनी निळा झेंडा दाखवून रॅलीला अभिवादन केले.ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने शिवाजी पुतळा,बसवेश्वर चौक मार्गे येवून डॉ.आंबेडकर चौकात विसर्जित झाली.


पंचशील नाट्य ग्रुप चे प्रमुख बंडू गायकवाड,आणि विजय गायकवाड यांनी शाळकरी मुलींचे लेझिम पथक रॅली मधे समाविष्ट केले होते ते संविधान गौरव रॅलीचे आकर्षण ठरले दुसऱ्या दिवशीच्या प्रबोधन कार्यक्रमात आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त जी महाथेरो यांच्या हस्ते संविधान ग्रंथाची पूजा करून उपस्थितांना त्रिसरण पंचशील देण्यात आले.

या गौरव सोहळ्यात कार्यक्रमाचे उदघाटक खा. इम्तीयाज जलील,प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत,  साहित्यिक भगवान वाघमारे यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, संविधान ग्रंथ,शाल ,पुष्पहार, देवून गौरविण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे दावूद मिर्झा,औरंगाबाद,फिरोज लाला नांदेड,प्राचार्य राम धबाले,ॲड.रवि गायकवाड,परभणी.ॲड.इम्तियाज,परभणी माजी.नगराध्यक्ष झाकिर कुरेशी,अनिल खर्गखराटे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.धम्मा जोंधळे,अब्दुल सलीम महमद साब,राजकुमार सुर्यवंशी,आखिल अहमद,प्राचार्य केशव जोंधळे, प्रा.डॉ.संतोष हांकारे,मधुकर गायकवाड,बंडू गायकवाड आणि संच यांनाही पुष्पहार,सन्मानचिन्ह,शाल देवून संविधान गौरव समितीचे प्रा.अशोक कांबळे,शिवाजी वेडे,भारत जोंधळे सिध्दार्थ भालेराव,रौफ कुरेशी यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी पुढे बोलतांना खा.इम्तियाज जलील म्हणाले,डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या सविधनामुळेच मला संसदेत जाण्याची संधी मिळाली.दालित,बौद्ध,आणि आंबेडकर वादी समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले,त्यांच्या मुळेच मला संसदेत जाता आले.त्यांनी भदंत उपगुप्त आणि भिक्खू संघाचेही आभार मानले.ते म्हणाले भंतेच्या आशीर्वाद मिळाले,आणि त्यांनीही मला संसदेत जाण्यासाठी परिश्रम घेतले.संविधानाचा गौरवार्थ खा.जलील म्हणाले,भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ आहे.मागच्याच वर्षी जगातील १२० देशांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा गौरव केला.ही मोठी बाब आहे.परंतु देशातील मोदी सरकार हे संविधान विरोधी असल्याने संविधान आज संकटात आहे.

संविधानाचा मोठा गौरव मोदीला हटवूनाच होवू शकतो.असेही त्यांनी प्रतिपादन केले.ते म्हणाले,"मोदी की निगाए कंहीपर है, और निशाणा कंही पर है"उन्हे देशसे संविधान को हाटाना है.ये हमे समझना चाहिए.असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी केले तर संविधान गौरव सोहळ्याचा २१ वर्षाचा संशिप्त इतिहास या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी मांडला.सूत्र संचलन दादाराव पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तम खंदारे यांनी केले हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी कॉ.अशोक कांबळे,गौतम काळे,मोहन लोखंडे,शाहीर गौतम कांबळे,सुनील जाधव,त्रिंबक गोविंदराव कांबळे,अतीक,मुकुंद पाटील,दिलीप गायकवाड,भीमा वाहुळे,किशन ढगे,बाळासाहेब राऊत,लक्ष्मीकांत शिंदे,मिलिंद कांबळे,पूर्णा शहरातील सर्व पत्रकार मित्र,महिला मंडळे व संविधान गौरव समितीच्या पदाधिकाऱ्यानी अथक प्रयत्न केले.

या दोन दिवसीय संविधान गौरव कार्यक्रमात विजय सतोरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात संविधानपर गीते गाऊन लोकांची मने जिंकली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या