🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रस्ता सुरक्षा अभियाना संदर्भात जनजागृती......!


🌟अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन🌟

✍🏻फुलचंद भगत - मंगरुळपीर 

वाशिम:-सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे.रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी,या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.रस्ता सुरक्षा अभियान एक महिन्याकरीता मर्यादित न ठेवता वर्षभर प्रत्येक कार्यालयाकडून, प्रत्येक नागरिकांकडून व वाहन चालकांकडून राबवणे गरजेचे असल्याने मंगरुळपीर येथे दि.१६ जानेवारी रोजी पक्के लायसन्स आणी लर्नर लायसन्सधारण करणारे अर्जदार यांना येथील स्थानिक विश्रामगृह परिसरात अपघात टाळन्यासाठी वापरण्यात येणारे नियम सांगुन रस्ता सुरक्षा सप्ताहासंदर्भात आरटिओ कार्यालयाचे मोटार वाहन निरिक्षक सौरभ सोयगावकर,सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक रविदास विनकरे यांनी मार्गदर्शन केले.


     उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्यावतीने 35 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन दि.१५ जानेवारी रोजी करण्यात आले.रस्ता सुरक्षा अभियानात संपूर्ण महिनाभरात विशेष तपासणी मोहिमा योग्यता प्रमाणपत्र,विमा प्रमाणपत्र व पी.यू.सी.तपासणी करणे. ओव्हरलोड/रिफ्लेक्टर तपासणी, सिटबेल्ट,हेल्मेट,टेललाईट / हेडलाईट इत्यादी तपासणी करण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती व्हावी याकरीता चौका-चौकात भिंतीपत्रके वाटप,चौक सभा, पथनाटय प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच नेत्र तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर, अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येणार आहेत.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा नियमांच्या पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले.नागरिकांना हेल्मेट वापरणे, सिट बेल्ट वापरणे,वाहनाचा वेग मर्यादीत ठेवणे व सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.मंगरूळपीर येथील रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यक्रमात श्री सोयगावकर आणी श्री.विनकरे यांनी वाहन चालकांना मद्यपान करून वाहन न चालविणे व ट्रिपलसिट वाहने न चालविण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी श्रीनाथ ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक निलेश राऊत,श्रीचंद राठोड,अजमलभाई,जिवाभाई,अतुल,कैलास जाधव,संजु मोरे,संतोष पवार यांचेसह अधिकारी- कर्मचारी,चालक प्रशिक्षण वाहन संस्था,वाहतूकदार संघटना तसेच नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या