🌟पालम ते लोहा या रस्त्यावर पूलावरुन ट्रॅक्टर कोसळल्याने चालक जखमी....!


🌟ट्रॅक्टर ५० फूट नदीपात्रात कोसळल्यामुळे ट्रॅक्टर चालक तुकाराम रामदास कर्‍हाळे गंभीर जखमी🌟

परभणी (दि.०९ जानेवारी) : जिल्ह्यातील पालम ते लोहा या रस्त्यावर आज मंगळवार दि.०९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कठडे नसलेल्या पुलावरुन ट्रॅक्टर खाली कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

           अंतेश्‍वर येथील छत्रपती पिराजी कर्‍हाळे यांचे ट्रॅक्टर क्र.एम.एच.२६ बी.सी.०४८० साखर कारखान्याकडे ऊस ओतून माघारी जात होता. त्यावेळी ट्रॅक्टर ५० फूट नदीपात्रात कोसळला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक तुकाराम रामदास कर्‍हाळे हे जखमी झाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या