🌟देशाच्या विकासात युवाशक्ती निश्चितपणे प्रेरक - प्रा.अरुण पडघन


🌟परभणी तालुक्यातील ब्राह्मणगावात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबीरात ते म्हणाले🌟              

परभणी (दि.२० जानेवारी) - आजची तरुण पिढी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असून राष्ट्रीय सेवा योजना तरुणांना विकासाची प्रेरणा देते.रासेयो उद्याचे सक्षम नेतृत्व देणारे संस्कारक्षम विद्यापीठ आहे.  त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत मनापासून सहभागी होत देश विकासाच्या कार्यात योगदान द्यावे.विधायक विचारांनी सुजाण माणूस घडला पाहिजे अशा सुंदर क्षणांची जुळणी करणारे रासेयोचे तुम्ही स्वयंसेवक शिल्पकार आहात.

राष्ट्रीय सेवा योजना शिबीरादी उपक्रम सुवर्ण अक्षरांनी नोंदवावेत असेच आहेत. त्याची नोंद समाज मनाच्या आठवणीत कायम राहणार आहे.महाविद्यालयातील विविध उपक्रमात रासेयो स्वयंसेवक अग्रणी राहत योगदान देत असतात.व्यक्तीत्वाचे विविध पैलू विकसित करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. आजचा नवतरुण मनात येईल तेव्हा देशात आपल्या कृतीतून निश्चितपणे परिवर्तन करू शकतो. अशा प्रकारचे सक्षम मूल्य विचार राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. म्हणून देशाच्या विकासात युवाशक्ती निश्चितपणे प्रेरक असल्याचे ही मत रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.अरुण पडघन यांनी मांडले.

            स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजश्री शाहू महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मौजे ब्राह्मणगाव येथे  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबीर आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अरुण पडघन बोलत होते. सुरुवातीला संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रल्हाद भगत होते. प्रा.योगेश कुराडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कल्याण गोपनर, प्रा.डॉ.सुरेश कदम,श्री निलेश काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

      विद्यार्थांनी दैनंदिन जीवनात भाषेचा वापर अस्सल ग्रामीण जीवन अनुभव मांडताना बोली भाषे बरोबरच इंग्रजी भाषेचा वापर करत आपले भाषिक कौशल्य विकसित करावे असे आवाहन प्रा.डॉ .रमण मुंडे यांनी केले .इंग्रजी भाषेची वेगळेपण या विषयावर , तर प्रा.डॉ. चिंचोलकर, ग्रामीण जीवन आणि बोली भाषा या विषयावर प्रा. डॉ. सुरेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संचलन शुभम कापुरे आभार श्रीधर शेळके यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या