🌟परभणीत आम आदमी पार्टीतर्फे वारंवार प्रश्‍नपत्रिका फोडणार्‍यां विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी आक्रोश मोर्चा....!


🌟महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत नोकर भरती संदर्भात परिक्षा सुरु : परंतु प्रश्न पत्रिका फोडण्याचे गंभीर प्रकार🌟 

परभणी : वारंवार प्रश्‍नपत्रिका फोडणार्‍यांविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी परभणीत काल मंगळवार 30 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा काढला होता.

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती संदर्भात परिक्षा सुरु आहेत. परंतु या परिक्षेतील प्रश्‍नपत्रिका या वारंवार फोडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगार मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आहेत. या प्रकरणातील संबंधित एजन्सीधारक असो किंवा अन्य गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिले, असे मत व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, जयवंत यादव, पूजा गिराम, पल्लवी आगळे, राजेश सोनपसारे, सुनील राठोड, प्रल्हाद टाकरस, अ‍ॅड. सुरेश चौधरी, आर्थिक पटेल, कैलास शिंदे, कृष्णा पौंढे, पांडुरंग बोबडे, आश्रोबा बोबडे, संतोष हांडगे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या