🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!🌟पुन्हा बघतो! मराठेही बरच काम हातात घेतील - मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा🌟

* महाराष्ट्राच्या महानिकालाला उरले काही तास,शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा उद्या दहा  जानेवारीला दुपारी 4-00 वा. निकाल*

*विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालापूर्वी भेट,उद्धव ठाकरेंचा आक्षेप,थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

* सांगलीत पूर्ववैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने खून, एका संशयितासह अल्पवयीन मुलास घेतलं ताब्यात

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं,अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का ? - रोहित पवार

* शिवसेना नेते आज रवींद्र वायकरांवर आयकरची धाड,उद्या रविंद्र साळवींच्या कुटुंबाची ACB चौकशी.

*अटक झाली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, ACB चौकशीवर राजन साळवींचे स्पष्ट बोल

* पुन्हा बघतो! मराठेही बरच काम हातात घेतील - मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा

* संविधानाशी इमान राखा, भाजपच्या संविधानाने गेल्यास न्याय होणार नाही ; आदित्य ठाकरे

* काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात शिक्षेला स्थगिती

* डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार, हायकोर्टाचा आदेश

* गाजराचं गाव म्हणून सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावाची आगळीवेगळी ओळख

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 जानेवारीला गंगापूर मतदारसंघात जलसिंचन पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी येणार; मात्र मराठा समाजाचा विरोध

* अमित ठाकरेंनी मारहाण केली, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा आरोप ; नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये राडा

* मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! शिंदे समिती 11 आणि 12 जानेवारीला मराठवाड्याचा दौरा करणार ; कुणबी नोंदी शोधणार

* नीट पीजी परीक्षा 3 मार्च 2024 रोजी होणार नसून आता 7 जुलै 2024 रोजी घेतली जाणार; नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं दिली माहिती* 

* शिर्डी साईबाबांना 29 लाखांचा सोन्याचा मुकुट दान ; बेंगलोरमधील भक्ताची साईचरणी अनोखी गुरुदक्षिणा

* कौतुकास्पद महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी पटकावली भीमा केसरीची गदा

* बेळगावमध्ये कन्नड सक्ती ; महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक, मराठी फलकासाठी आग्रही

* प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास                            

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या