🌟पुर्णा तालुक्यात चोरट्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचा महसूल अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न ?


🌟कान्हेगाव नदीपात्रातून चोरट्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग करीत पकडण्याच्या प्रयत्नात नायब तहसीलदार जखमी🌟 

पुर्णा (दि.१६ जानेवारी) : पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर तुटून पडलेल्या वाळू तस्करांशी महसूल प्रशासनातीलच काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांनी हितसंबंध जोपासण्यास सुरुवात केल्याने संपूर्ण तालुक्यात रेती तस्कर माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे निदर्शनास येत असून याचा परिणाम आता दस्तूरखुद्द महसूल प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनाच भोगण्याची वेळ आल्याचे पहावयास मिळत आहे

पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीचे उत्खनन करुन त्या चोरट्या रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांना काल सोमवार दि.१५ जानेवारी २०२४ रोजी रात्री उशिरा मिळाल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे असून त्या मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत थारकर,महसूल अधिकारी के.पी.शिंदे यांना सदर चोरटी रेती वाहतूक करणारे वाहन तात्काळ पकडण्याचे आदेश दिले तहसीलदार बोथीकर यांच्या आदेशानुसार महसूल अधिकारी व सोबत शिपाई विठल होनमने,कोतवाल नवनाथ भालेराव, दता कानडे, वाहन चालक शेलाटे यांना सोबत घेवून दोन मोटारसायकल वरुन गणपूर फाटा येथे सापळा रचला रात्री १०-०० ते ११-०० वाजेदरम्यान कान्हेगाव येथील पुर्णा नदीपात्रावरील रेतीस्थळावरुन अवैध उत्खनन करुन चोरट्या मार्गाने रेती भरून येणारा टिप्पर त्याना दिसला महसूल प्रशासनाच्या पथकातील कर्मचाऱ्यांना पाहून टिप्पर चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने मिरखेलच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली त्यामुळे महसूल अधिकारी नायब तहसीलदार थारकर व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मोटारसायकलने पाठलाग करुन टिप्परच्या पुढे जाऊन वाहन थांबवण्यास सांगितले परंतु त्या मुजोर चालकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करीत वाहन पुढे पळवले या घटनेत नायब तहसीलदार थारकर गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या हाताला जबर मार लागला. तरी देखील पथकातील अन्य अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन मिरखेल जवळ अवैध रेती वाहतूक करणारा टिपर नंबर एम.एच.२९ टी १६१२ हे वाहन चालकासह पकडून पुढील कार्यवाहीसाठी पूर्णा तहसील कार्यालयात आणून लावले असले तरी संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या घटने संदर्भात पोलीस प्रशासनाकडे रितसर तक्रार दाखल केली की नाही ? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर अवैध रेती तस्करशाहीने उघडपणे आपले साम्राज्य निर्माण केले असतांना तहसिलदार व महसूल प्रशासनातील बोथट कारभारी जाणीवपूर्वक झोपेच सोंग घेत आहेत की अवैध रेती तस्कर माफियांशी हितसंबंध जोपासण्यात स्वतःला धन्य समजत आहेत असा गंभीर प्रश्न देखील जनसामान्यांत उपस्थित होतांना दिसत आहे तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून महसूल गौन खनिज कायद्याची अक्षरशः पायमल्ली करुन अवैध रेती तस्कर माफिया तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांनाही न जुमानता सर्रास अवैध चोरट्या रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खननासह वाहतूक करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील पुर्णा-गोदावरी पात्रांचे अक्षरशः लचके तोडून मिळणाऱ्या प्रचंड पैश्यामुळे मुजोर झालेली अवैध रेती तस्कर माफियाशाही अवैध रेतीच्या धंद्यात आडवे येणाऱ्या कोणालाही मारण्यासाठी धाडस करीत आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा जमा झाल्याचे नागरीकातून चर्चिले जात आहे  या गंभीर घटनेकडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलिस अधिक्षक रागसुधा आर जातीने लक्ष देऊन या अवैध रेती तस्कर माफियाशाहीला लगाम लावण्याच्या दृष्टीने कठोर पावलं उचलतील काय ? असाही प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या