🌟श्रीराम जन्मभुमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभागी कारसेवकांच्या सन्मानाला धावले नगरसेवक ॲड.राजेश भालेराव....!


🌟पुर्णेतील नगरसेक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली कारसेवकांचा त्यांच्या निवासस्थानी ढोल-ताशांच्या गजरात सपत्नीक सन्मान🌟 


🌟कारसेवकांच्या प्रखर लढ्यामुळेच पाचशे वर्षांपूर्वीची गुलामीची चिन्ह पुसली गेली - नगरसेवक ॲड.राजेश भालेराव 

पुर्णा (विशेष वृत्त) -'कारसेवको के बलिदान से मंदीर हुवा निर्माण चलो करते हैं इस शुभ अवसरपर उन कारसेवको का भव्य सन्मान' सन १५२८ साली तब्बल जवळपास पाच शतकांपूर्वी मुघल आक्रमनकारी बाबर याने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम रामजन्मभूमी मंदिर उध्वस्त करीत त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने बाबरी मशिदेचे निर्माण करण्याचे पाप केले होते या जागेवर ताबा मिळवून श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण करण्यासाठी हिंदुना न्यायालयीन लढाईसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करावा लागला सन १९९० साली अयोध्येत झालेल्या आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या अत्याचारी निर्देशावरुन असंख्य कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील देखील अनेक कारसेवक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले होते परंतु तत्कालीन अत्याचारी राज्यकर्त्यांनी त्यांची उत्तर प्रदेशाच्या सिमेवरच त्यांची अडवणूक केली यानंतर पुन्हा १९९२ यावर्षी श्रीराम जन्मभुमी मुक्ती आंदोलन झाले यावेळी कारसेवकांनी रामजन्मभूमी स्थळावरील बाबरीचा ढाचा उध्वस्त करीत या जागेवर प्रत्यक्ष ताबा मिळवला यावेळी देखील परभणी जिल्ह्यासह पुर्णा शहरासह तालुक्यातील कारसेवकांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.


सन १५२८ ते २०२४ अश्या जवळपास ४९६ वर्षाच्या प्रदिर्घ संघर्षानंतर आज सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभुमी स्थळावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा' संपन्न होत असतांना संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील 'माझे शहर माझी अयोध्या' या संकल्पने अंतर्गत प्रभु श्रीरामचंद्रांच्या भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक पर्वात ज्यांनी श्रीराम जन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभाग नोंदवून या सुखद क्षण प्रत्यक्ष पाहण्याचा योग मिळवून दिला त्या कर्मयोगी कट्टर कारसेवकांना विसरून कसे जमणार या निर्मळ हेतूने पुर्णा नगर परिषदेचे शिवसेना नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड.राजेश भालेराव यांनी काल रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी 1990 व 1992 मध्ये राम जन्मभूमी अयोध्या येथील आंदोलनात सहभाग नोंदवलेल्या कारसेवकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन ढोल/ताशांच्या गजरात फेटे बांधून शाल पुष्पहार घालून सपत्नीक सत्कार केला.


यावेळी यावेळी सन्माननीय ॲड.शिवप्रसाद सोनी,श्यामसुंदर सोनी यांनी बाबरी ढाचा उध्वस्त करतेवेळी वापरलेल्या हातोड्याचे देखील पूजन करण्यात आले तर वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर चढून कारसेवा करणारे कारसेवक सन्माननीय माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे रवी परडे व अवघे १५ वर्षें वय असतांना हिंमतीने प्रत्यक्ष कारसेवेत सहभाग नोंदवून आपल्या प्रखर धार्मिकतेचे दर्शन घडवणारे चंद्रकांत लोखंडे,सोमनाथ अण्णा कापसे, सत्यनारायण अग्रवाल,रमलू अकुल,बालाराम यादव,रवी परडे,अनंता जोशी, मधुकर जोशी,मधुकर ठाकूर,शिवराम भंगे,प्रभु दयाल ओझा, लक्ष्मीकांत चीतलांगे, विष्णुपंत कमळू,विश्वनाथ कानबाले,सतीश टाकळकर,भाई विश्वनाथ भायेकर आदी कारसेवकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.



यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना नगरसेवक ॲड राजेश भालेराव म्हणाले की अयोध्येतील आज २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेला ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा' प्रत्यक्ष पाहण्याचा योग ज्यांच्या मुळे आला त्या लढवय्या सन्माननीय कारसेवकांचा विसरुन कसे जमेल त्यांच्या प्रखर लढ्यामुळेच पाचशे वर्षांपूर्वीची गुलामीची चिन्ह पुसली गेली आणि आज पुन्हा प्रभु श्रीरामचंद्र अयोध्येतील आपल्या जन्मभूमीवर विराजमान झाले हा क्षण संपूर्ण हिंदुधर्मीयांसाठी ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस आहे असेही यावेळी नगरसेवक ॲड.राजेश भालेराव म्हणाले...... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या