🌟पुर्णेत रोशन क्रिकेट क्लब व वीके रायडर्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुर्णा क्रिकेट लीगचे आयोजन...!


🌟 यावेळी 'समाज भुषण पुरस्कार प्राप्त' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती🌟 


पुर्णा : पुर्णा येथील मिल ग्राउंडवर रोशन क्रिकेट क्लब व वीके रायडर्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच लेदर बॉल क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आलेले असून या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१ हजार रुपयें चषक व द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी अध्यक्ष म्हणून आदर्श व्यक्तिमत्व वरिष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड तर उद्घाटक म्हणून पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब उपस्थित यांची उपस्थिती होती या प्रसंगी पुर्णा पोलिस स्थानकाचे 'समाज भुषण पुरस्कार प्राप्त' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री प्रदीपजी काकडे, पुर्णेतील भारतीय स्टेट बँकेचे जनहीवादी शाखाधिकारी गोपाळ काटोळे पुर्णा रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी कामगार नेते कांचन ठाकूर, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, हभप सोपान काका बोबडे, साहेबराव सोनवणे, डॉ.हरीश मोरे उपस्थित आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा.अब्दुल अन्सार यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेख समी,भगवान सोळंके,विजय पल्ले,वीरेंद्र कांबळे,मिर्झा आवेज, शेख मुजीब, विकी वैजवाडे, प्रशांत वाघोदे, सलमान खान कधी परिश्रम घेत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या