🌟राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर.....!


🌟सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक,जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे.त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ,यॉटींग,पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग,कॅरम,बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर,सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स,ॲक्रोबॅटिक्स या खेळांसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि.२५ जानेवारी, २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. शासनाच्या  २९ डिसेंबर २०२३ रोजीचा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ४.४ येथे इक्वेस्टरियन, गोल्फ,यॉटींग,पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग,कॅरम,बिलीयर्डस अॅन्ड स्नूकर,सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पुरस्काराकरीता विहित केलेला अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे येथे  ३१ जानेवारी,२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे,असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या