🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन....!


🌟यावेळी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते🌟

पुर्णा (जं) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारतीय स्री शिक्षणाच्या जनक पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा भोसले यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या  वतीने विनम्र अभिवादन केले. 

तर यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अधिसभा सदस्य डॉ विजय भोपाळे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा डॉ प्रभाकर कीर्तनकार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी स्री शिक्षणाच्या जनक सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी  प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय कसाब,प्रा.डॉ.भारत चापके , प्रा.डॉ जितेंद्र देशमुख , प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर,डॉ. विलास काळे, प्रा जगन्नाथ टोंपे, प्रा. डॉ.मारोती भोसले, प्रा. डॉ.शारदा बंडे,प्रा. वैशाली लोणे, प्रा.डॉ.अनिता भोळे,प्रा. दता पवार, वरिष्ठ लिपिक सूर्यकांत भोसले, दत्ता कदम , प्राध्यापक व कर्मचारी  मोठ्या  संख्येने उपस्थित उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या