🌟सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन तहसिलदार संदिप राजपुरे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.25 जानेवारी) : परभणी तालुक्यातील विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत एकदा ज्या बँकेत खाते आहे अशा बँक व्यवस्थापकाकडे उपस्थित राहून हयात असल्याचे हयात प्रमाणपत्र बँक व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीने संजय गांधी योजना कार्यालयात सादर करावे असे आवाहन तहसिलदार संदिप राजपुरे यांनी केले आहे.

परभणी तालुक्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणा-या संजय गांधी निराधार अनूदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांनी आपल्या बँकेच्या व्यवस्थापकाकडे आधारकार्ड, बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रत सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली अूसन या कालावधीत सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन बोगस लाभार्थ्यांवर आळा बसेल.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या