🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळसचे भुमिपुत्र शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन रँली संपन्न....!


🌟पोलिस वसाहत पासुन ते शहीद जवान स्मारकापर्यंत काढण्यात आली रँली🌟


पुर्णा : पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भुमिपुत्र शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोलिस वसाहत पासुन ते शहीद जवान स्मारकापर्यंत विद्यार्थ्यांनी लेक्षीम पथकासह काढलेल्या अभिवादन रँलीत अमर रहे,अमर रहे शहीद जवान बालाजी आंबोरे अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

ताडकळसचे भुमिपुत्र असलेले बालाजी भगवान आंबोरे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना या जवानास ३० जानेवारी २०१७ रोजी विरमरण आले होते. तेव्हापासून ताडकळस येथे शहीद जवान बालाजी आंबोरे स्मारक समिती व ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी ३० जानेवारी हा स्मृतीदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी ७ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार ३० जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांची अभिवादन रॅली काढण्यात आली. या रँलीत लेझीम पथक, विविध राष्ट्रीय महापुरुषांचे सजीव देखावे सादर करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय,अमर रहे अमर रहे शहीद जवान बालाजी आंबोरे अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या निवासस्थानी स्मृतींना विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. तसेच गावातील महिलांनी औक्षण करून जागोजागी रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. मुख्य अभिवादन सोहळा शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला. यावेळी विरपिता भगवान आंबोरे,विरमाता लताबाई आंबोरे, विरपत्नी अंजली आंबोरे,विरबंधु कामाजी आंबोरे, महागाव येथील शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांची विरपत्नी भाग्यश्री मोहिते, विरपिता किशनराव मोहिते, हवालदार माजी सैनिक शेख गुलाब, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान नसिब मुनवरखाँ पठाण, सपोनि कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर तरडे, ग्रामविकास अधिकारी पाचपुंजे,सरपंच गजानन आंबोरे, रंगनाथ भोसले, रामराव आंबोरे, माधवराव जाधव, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शालेय विद्यार्थी, आजी माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष सुदर्शन आंबोरे, सचिव अमोल आंबोरे, कोषाध्यक्ष सुरेश मगरे, नारायण लासे,राज आंबोरे, तुकाराम ढोणे,राजु गवते, गजानन आळणे , गजानन नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन सुरेश मगरे, साहेब शिंदे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या